आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांकडून बेदम मारहाण

वृत्तसंस्था

बांगलादेश क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बांगलादेश मध्मे १२ जून रोजी ढाका येथे लिस्ट ए स्पर्धा संपवून रात्री उशिरा घरी परतत असताना नयीम हासन या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटूला पोलिसांनी बेदम मारहाण केली.

झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बांगलादेशच्या संघात निवड झालेल्या या खेळाडूवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पत्रकारांशी बोलताना नयीमने त्या रात्रीचा थरार सांगितला. तो म्हणाला, “विमानाला विलंब झाल्याने मी विमानतळावरून गाडीने घरी येत होतो. रात्री ११:२५ च्या सुमारास पोलिसांनी लंकन बाजार उड्डाणपुलाखाली माझी गाडी थांबवली.”  तो पुढे म्हणाला, “मी त्यांना सहकार्य करत बॅग तपासण्यास सांगितले, पण त्यांनी अचानक माझा गळा पकडला आणि बळजबरीने त्यांच्या गाडीत कोंडले. मी विरोध केला असता त्यांनी मला बाहेर ढकलून बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली. मी एक राष्ट्रीय क्रिकेटपटू असून देशासाठी कसोटी खेळतो, असे वारंवार सांगूनही त्यांनी काहीच ऐकले नाही. शेवटी वरिष्ठांचे फोन आल्यावरच त्यांचा सूर बदलला

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!