शासकीय अध्यापक महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त पंधरवडा

शासकीय अध्यापक महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त पंधरवडा
विविध उपक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी | बुलडाणा
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती निमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलडाणा येथे पंधरवडा साजरा करण्यात आला.या पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती, त्याग आणि नेतृत्वगुण रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंधरवड्याची सुरुवात १६ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.एन.बी.चव्हाण या होत्या. यावेळी जेष्ठ प्रा.डॉ.एच.पी.खोब्रागडे ,कार्यक्रम प्रभारी प्रा.भावना काळे, प्रा. डॉ. सुनील खडसे प्रा.पी.ए.श्रीनाथ, ग्रंथपाल प्रा. विनायक वरखेडे तसेच बी.एड. आणि एम.एड चे छात्र-अध्यापक उपस्थित होते.
—- असे झाले विविध कार्यक्रम—
१७ जानेवारी रोजी देशभक्तीपर कविता व गीत गायन स्पर्धा, १९ जानेवारी रोजी नेताजींचे जीवन , कार्य व आझाद हिंद सेना यावर आधारित प्रश्नमंजुषा, २० जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस : ‘’अनोखे पैलू ’’ यावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन, २१ जानेवारी रोजी “नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रप्रेम, आझाद हिंद सेना, शौर्य व बलिदान, स्वातंत्र्यासाठीचा त्याग आणि देशभक्ती” या विषयावर रांगोळी स्पर्धा, २२ जानेवारी रोजी “नेताजी सुभाषचंद्र बोस — क्रांती आणि राष्ट्रभक्तीचे प्रतिक ”, “आझाद हिंद सेनेचे स्वप्न आणि नेताजी”, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूंगा” या विषयांवर चित्रकला स्पर्धा, २३ जानेवारी रोजी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. या दिवशी “राष्ट्रप्रेमावर आधारित देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढा”, “नेताजींच्या राष्ट्रप्रेमाची भावनात्मक अभिव्यक्ती” त्याच बरोबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेयांच्या चरित्रावर प्रकाश टाकला आणि नृत्य व नाट्य सादरीकरणे करण्यात आली.
— समारोप ३१ जानेवारी रोजी पार पडला—

२४ जानेवारी रोजी “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान”, “नेताजी आणि आझाद हिंद सेना”, “आझाद हिंद सेनेचा इतिहास व महत्त्व” या विषयांवर निबंध स्पर्धा, २७ जानेवारी रोजी “नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि आधुनिक भारत”, “स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी नेतृत्व — नेताजी”, “नेताजींच्या विचारांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव” या विषयांवर परिसंवाद, २८ जानेवारी रोजी “नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन व कार्य”, “आझाद हिंद सेनेची स्थापना व संघर्ष”, “नेताजींचे स्वातंत्र्य स्वप्न” या विषयांवर आधारित नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले. २९ जानेवारी रोजी “नेताजींचे प्रेरणादायी विचार”, “नेताजी सुभाषचंद्र बोस — युवाशक्तीचे प्रेरणास्थान”, “देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे नेताजी” या विषयांवर पोस्टर स्पर्धा, ३० जानेवारी रोजी “नेताजींचे क्रांतिकारी विचार आणि आजची युवा पिढी” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, ३१ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पंधरवड्याचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!