राष्ट्रसंत सेवालाल महाराज व जगदंबा माता सभा मंडपाचे पार पडले भूमिपूजन

| मलकापूर पांगरा,

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील वाघाळा येथे संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. हे काम आमदार मनोज कायंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांचे समर्थक मोहन सानप यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामामुळे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गावाला सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी समस्त गावकरी, बंजारा समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार मनोज कायंदे यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सभामंडपाच्या उभारणीमुळे गावातील धार्मिक उत्सव, सामाजिक कार्यक्रम आणि सामुदायिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा निर्माण होणार असून, ग्रामस्थांनी या विकासकामाचे स्वागत केले.
या वेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच पती विष्णु काकड माजी सरपंच पती रामेश्वर सोनुने सर गावचे सामाजिक व्यक्ती विष्णु मान्टे, जगा राठोड नाईक, माऊली गिते, संजय सानप, रवींद्र राठोड, सोपान राठोड, विजय राठोड, विजय चव्हाण, मुकिंदा राठोड, गजानन सोनुने, राजु चव्हाण, खंडू चव्हाण, राजु चकोते, सुभाष निंबेकर, प्रभाकर निंबेकर, सुनील बुधवत, बाजीराव वानखेडे, मिस्त्री दराडे आदी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!