समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक; क्लीनर जखमी, डुलकीमुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज

बुलडाणा,
जिल्हयातील डोणगाव परिसरातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मालवाहू ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर किरकोळ जखमी झाला. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरकडे निघालेला मालवाहू ट्रक क्र. आरजे ११ जीडी ४४१२ हा डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक २६९.४०० परिसरातून जात असतांना हा अपघात घडला. ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या केबिनचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या अपघातात ट्रकचालक लेकराज वय २६, रा. टेडीबगिया, जि. आग्रा, उत्तर प्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर क्लीनर सोनू निरंजन निषाद रा. फरे, जि. मथुरा, उत्तर प्रदेश हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व डोणगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीला रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी डोणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!