स्वजिल्हयातच प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’ आंदोलन

सिंदखेड राजा,

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  सिंदखेड राजा बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध नोंदविला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सदर आंदोलन बुधवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरमयान करण्यात आले.

     शहरात बुधवारी कार्यकर्त्यांनी १५ ते २० मिनिटे रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याचे सांगत संबंधित सोशल मीडिया पोस्ट तातडीने हटवावी, तसेच सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.  आंदोलनादरम्यान “हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद” तसेच “अजित पवार अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. निषेधाचा भाग म्हणून सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, नगरसेवक कैलास मस्के, नगरसेवक आवेज खान, वैभव मिनासे, राजेंद्र अंभोरे, मोहसीन (छोटू) शेख, अरिफ खान, नितीन शेळके, अरेफ चौधरी, सागर मेहत्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!