भाजपचे पूर्वी टिपू सुलतानवर प्रेम होते – सचिन सावंत

सपकाळांची केली पाठराखन

मुंबई,

काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून भाजपने केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. या प्रकरणी काँग्रेसने भाजपचे टिपू सुलतानवरील प्रेम दर्शवणारे विविध दाखले दिले आहेत. भाजपचे पूर्वी टिपू सुलतानवर प्रेम होते, पण आता ध्रुवीकरणाच्या अजेंड्यामुळे आज तो त्यांच्यासाठी वाईट झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरून भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असून, सपकाळ यांच्या माफीची मागणी केली आहे. पण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपची ही टीका जोरकसपणे फेटाळून लावत भाजपचेच टिपू सुलतानवर प्रेम असल्याचा दावा केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!