सपकाळांनी टीका करतांना स्वता:ची उंची लक्षात घ्यावी – आ.डॉ. संजय कुटे

जळगांव जामोद
स्वतःला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक म्हणवून घेणाऱ्या सपकाळांना त्यांच्या विचारांची आणि भाषेची मर्यादा जपता येत नसेल, तर त्यांना नेमकं काय म्हणावं? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी केलेले अवमानकारक वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. सपकाळांनी टीका करतांना स्वतांची उंची लक्ष्यात घ्यावी, अशी टीका आ. संजय कुटे यांनी केली.
नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असतांना कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका करतांना त्यांची जीभ घरसली. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सपकाळ यांना निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान सपकाळ यांचा निषेध करतांना आ. कुटे म्हणाले की,
महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही नेहमीच सभ्यता, संस्कार आणि वैचारिक भूमिकांवर आधारित राहिली आहे. मतभेद असू शकतात, परंतु टीका करताना भाषेची मर्यादा पाळणे, ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. दुर्दैवाने काँग्रेसकडून सातत्याने खालच्या स्तरावरील राजकारण आणि वैयक्तिक टीकेची संस्कृती पुढे आणली जात आहे. अशा प्रकारची अश्लाघ्य भाषा आणि वैचारिक दिवाळखोरी वक्तव्याचा जाहीर व तिव्र निषेध करतो असे मत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केले.
000




