आ. महाले यांचा आ. संजय गायकवाड वरील शाब्दीक वार ठरला फुस पटाखा
आ. गायकवाड यांचे चिखली विधानसभात हातपाय पसरण्याची पुर्ण तयारी

प्रतिनिधी | बुलडाणा,
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभेत हातपाय पसरण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. याची पहिली पायरी म्हणजे चिखलीतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. राजकिय दावे ही केले, मात्र हे सर्व झाल्यावर भाजपच्या आमदारांना उशिरा जाग आल्याचे दिसून आले. सदर प्रवेश झाल्यावर सख्तीने प्रवेश घडवून आणल्याचा आरोप करत, दादागिरी केली जात असल्याचा दावा आ. महाले यांनी केला आहे. यासह आ. महाले यांचे स्विय सहायक इंगळे यांनी ही अप्रत्यक्षरित्या आ. गायकवाड यांच्यावर टीका करतांना वाचाळ लोक, शिक्षणाचा अभाव त्यामुळे ते स्वतच अडचणीत येतात अशी टीका केली. सदर दोन्ही टीकेचा आ. गायकवाड यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. परंतू आ. गायकवाड यांनी बुलडाण्यात बसल्या बसल्या जी खेळी खेळली आहे, यामुळे भाजप जिल्हा पार्टीत खळबळ उडाल्याची चर्चा आहे.
राजकारण म्हटले की, हेवे दावे आलेच. आज पर्यत कोणत्याच आमदाराने आपली विधानसभा सोडून दुसऱ्या विधानसभेत ही ढवळाढवळ केली नव्हती. परंतू नियम पाळतील ते, आमदार संजय गायकवाड कसले. आ. संजय गायकवाड हे पूर्वीपासून आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कधी काय बोलायचे, शब्दांची खेळी कशी करायची हे, प्रसारमाध्यमासमोर काय बोलायचे हे त्यांच्या डोक्यात अाधीच तयार असते. मागील अनेक वर्षापासून त्यांच्या डोक्यात चिखली विधानसभेत हस्तक्षेपचे नियोजन तयार होते. आ. गायकवाड हे केवळ संधीची वाट पाहत होते. सध्या जिल्हा परिषदच्या पार्श्वभूमिवर त्यांना ही संधी मिळाली व त्यांनी मृत्युंजयच्या पाठीमागे उभे राहून ओपनिंग ही सुुरु केली. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात त्यांना काय बोलायचे ते बोलून मोकळे झाले. त्यानंतर त्यांनाही माहिती होते की, प्रतिक्रिया येणारच आहे. चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया ही दिली, परंतू या प्रतिक्रियेचा त्यांच्यावर कोणताच परिणाम दिसून आला नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा भाजपा पार्टीत खळबळ उडाली आहे. वरिष्ठापर्यत सदर घटनेची माहिती ही देण्यात आल्याची माहिती आहे.
आ. गायकवाड यांच्यावर शाब्दीक वार करावरयाचा असला तरी तेवढयाच ताकदीचा आरोप, अथवा त्यांच्या विरोधात तसा दावा असल्या शिवाय त्यांना फरक पडणार नाही. त्यामुळे भाजपा आमदार आता काय बोलतात किंवा निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.




