रोहिणी खडसे व चित्रा वाघ यांच्यात जुंपली

खडसे म्हणाल्या, आयत्या बिळावरील नागोबांनी बुद्धीवर बोलू नये

नागपूर | प्रतिनिधी

भाजप नेत्या चित्रा वाघ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसापासून दोघात चांगलेच शाब्दीक वाद समाेर येत आहे. नुकतेच चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना रोहिणी खडसे यांनी त्यांना आयत्या बिळावरील नागोबा असे म्हटल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.

काही दिवसापूर्वी चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका करतांन म्हटले होते की,   तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असा खोचक सवाल वाघ यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आता रोहिणी खडसे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.  रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, ज्यांचा बुद्धीशी काडीचाही संबंध नाही अशा ‘चित्रा’विचित्र लोकांनी बुद्धी विषयी न बोललेले बरे! माझ्या वडिलांवर बोलण्याआधी लक्षात ठेवा की ज्या पक्षात तुम्ही आमदार म्हणून मिरवत आहात. त्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात माझ्या वडिलांचा वाटा आहे. आयत्या बिळावरील नागोबांनी जरा बुद्धीवर जोर देऊन बोलावे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!