आयएमए, महाकॉन तर्फे डॉ. भगवान झंवर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते गौरव सोहळा पडला पार

प्रतिनिधी | मेहकर,
आयएमए व महाकॉन मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिनर्जी इन क्लिनिकल प्रॅक्टिस’ या वैज्ञानिक कार्यक्रमात ज्येष्ठ व समर्पित चिकित्सक डॉ. भगवान झंवर यांना प्रतिष्ठेचा ‘लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा मेहकर येथील डॉ. भगवान झंवर आयएमए हॉलमध्ये उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम नुकतेच पार पडला.
सदर पुरस्काराचे वितरण केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळाच्या समर्पित सेवेसोबतच समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. दरम्यान कार्यक्रमात आयएमए मेहकरचे अध्यक्ष डॉ. विनय सावजी यांनी डॉ. झंवर यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेत सांगितले की, डॉ. झंवर यांनी १९८० मध्ये शासकीय सेवेत प्रवेश करून तब्बल ३२ वर्षे कोणत्याही बदलीशिवाय मेहकर येथे वैद्यकीय अधिकारी व अधीक्षक म्हणून अखंड सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी भाजलेल्या रुग्णांचे उपचार, विषबाधा आणि इतर गंभीर आपत्कालीन प्रकरणांचे यशस्वी व्यवस्थापन केले. सुमारे १४ हजार कुटुंब नियोजन (ट्युबेक्टोमी) शस्त्रक्रिया करून त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्याचबरोबर, मर्यादित सुविधांच्या काळात सहा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणारी शवविच्छेदन व वैद्यकीय कायदेशीर जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. झंवर विविध सामाजिक संस्थांशी संलग्न राहून आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि जनकल्याणाचे उपक्रम राबवत आहेत. सध्या ते त्यांचे सुपुत्र डॉ. अभिनव झंवर (डीएम मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, कमलनयन बजाज रुग्णालय, संभाजीनगर) यांच्या सोबत कॅन्सर जनजागृती मोहिमेत सक्रिय आहेत.
मंत्री प्रतापराव जाधव यांनी डॉ. झंवर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. संतोष गावंडे, सचिव डॉ. सुभाष खुराड, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकांत राठोड यांच्यासह आयएमए मेहकरच्या सर्व सदस्य मोठया

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!