कुवरदेवच्या आदिवासी बांधवांसोबत राजर्षी शाहू परिवाराची दिवाळी

फराळासह नवीन कपड्यांचे वाटप; आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची मोफत तपासणी

जळगाव जामोद 

दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि दुर्गम भागातील नागरिकांनाही सणाचा उत्साह अनुभवता यावा, या सामाजिक भावनेतून राजर्षी शाहू परिवाराने तालुक्यातील आदिवासीबहुल कुवरदेव गावात दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके आणि अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करीत फराळ व नवीन कपड्यांचे वाटप केले. यावेळी ग्रामस्थांसोबत स्नेहभोजनाचाही आनंद घेण्यात आला.

कुवरदेव हे दुर्गम भौगोलिक परिस्थिती असलेले आदिवासीबहुल गाव असून, येथे आजही अनेक मूलभूत सुविधांची मर्यादित उपलब्धता आहे. या गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी संदीपदादा शेळके यांनी गाव दत्तक घेतले आहे. त्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने येथे दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली जात आहे. यंदाही धनत्रयोदशीच्या औचित्याने हा स्नेहसोहळा उत्साहात पार पडला. भेटवस्तूंच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

२०० रुग्णांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ

सणाच्या आनंदासोबतच आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, हा या शिबिरामागील मुख्य हेतू होता. या शिबिरात सुमारे २०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांना औषधांचेही विनामूल्य वितरण करण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या आरोग्य शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. उज्वला अविनाश पाटील, जामोद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा फुंडकर, डॉ. एल. एस. साळोक, आरोग्य सेवक डॉ. अमर रायपुरे आणि ए.एन.एम. तनुजा चौधरी यांनी रुग्णांची तपासणी करून आरोग्यसेवा दिली.

यावेळी राजर्षी शाहू फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेश काकडे, संस्थेच्या संचालिका छायाताई शेळके, कुवरदेवचे उपसरपंच रमेश सत्या, गणेश फाळके, सचिन फाळके, अमोल तायडे, हरिभाऊ शेळके, राजू शेळके, वासुदेव वायझोडे, श्याम वायझोडे, शरद महाराज, रवी काकडे, शरद मोहिते, संजय लोखंडे, वसंता इंगळे, लक्ष्मण वाडोदे, अनिल गावंडे, देविदास धोटे, विश्वनाथ गावंडे, रवींद्र गावंडे, पंकज काळे, संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांच्यासह मुख्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीचा आठ वर्षांचा वारसा

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत मदत, आरोग्यसेवा आणि आपुलकी पोहोचविण्याचे काम राजर्षी शाहू परिवाराकडून सातत्याने केले जात आहे. केवळ सणानिमित्त भेटवस्तूंचे वाटप न करता गावातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे, त्यांच्या अडचणींमध्ये सहभागी होणे आणि त्यांना आधार देणे, या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!