रविराज महाजन यांनी केली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

  • धामणगाव बढे

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांचे मागील आठ ते दहा महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशातच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर आला असताना कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे अत्यंत आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते रविराज महाजन यांनी माणुसकीचे दर्शन घडवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवली.

ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य नव्हते मात्र या दुष्काळाच्या वेळी वसुली होने पण शक्य नाही अश्या परिस्थितीत , तातडीने आणखी एक लाख रुपयांची आवश्यकता असल्याने ग्रामसेवक राठोड यांनी ही अडचण रविराज महाजन यांच्यासमोर मांडली. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांनी एक लाख रुपये उसनवारी स्वरूपात मदत केली होती.

त्याच सामाजिक बांधिलकीतून ग्रामसेवक राठोड यांनी पुन्हा एकदा दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक लाख रुपये उसनवारीने मागितले. कर्मचाऱ्यांची अडचण आणि सणासुदीच्या काळातील त्यांची गरज लक्षात घेऊन रविराज महाजन यांनी कोणताही विलंब न करता तातडीने एक लाख रुपयांची रोख रक्कम ग्रामसेवक राठोड यांच्याकडे सुपूर्द केली.

स्वतःचा कोणताही स्वार्थ न ठेवता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी, या भावनेतून त्यांनी केलेली ही मदत निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात.

रविराज महाजन यांनी केलेल्या या सहकार्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या या तत्पर मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

**दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी!**

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!