कामावर निघालेल्या १७ वर्षीय नवलचा अचानक मृत्यू; धामणगाव बढे गावावर शोककळा

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ हरपला; कुटुंबाचा आधार हरवल्याने गरीब परिवारावर दुःखाचा डोंगर

 

धामणगाव बढे | एस. बी. शेख

येथील अवघ्या १७ वर्षीय नवल राजू बोरसे या तरुणाचा कामावर जात असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने धामणगाव बढे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका गरीब कुटुंबाचा आधार हरपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

नवल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी असून, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अल्पवयातच तो मोलमजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. त्याचे वडील राजू बोरसे हे हेअर सलूनचा व्यवसाय करतात. चार बहिणींचा एकमेव भाऊ आणि आई-वडिलांचा आधार असलेल्या नवलचा अचानक मृत्यू झाल्याने बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवघ्या १७ वर्षांच्या तरुणाचे असे अकाली जाणे मनाला चटका लावणारे ठरले आहे. कुटुंबातील कर्ता हात गमावल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असून, बोरसे परिवाराचे सांत्वन केले जात आहे.
नवल बोरसे यांच्यावर आज दुपारी २ वाजता धामणगाव बढे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली

 

 

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!