अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक; २० नोव्हेंबरला पोलीस ठाण्यावर धडक

 जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांचा घेरावाचा इशारा

धामणगाव बढे | एस. बी. शेख
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारींनी आता राजकीय वळण घेतले आहे. परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

प्रशासनाने निवेदनातील मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिवसेनेच्या वतीने धामणगाव बढे पोलीस ठाण्यावर घेराव आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती आमदार संजय रामभाऊ गायकवाड, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित अवैध धंद्यांविरोधात कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!