लोणार येथे ईद-ए-मिलाद-उन्नबी मोठ्या उत्साहात साजरा
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्प गुलाब देऊन मिठाई व शीत पाणी वाटप

लोणार
जगाला अमन व शांतीचा पैगाम देणारे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मोत्सव निमित्त २६ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलाद-उन्नबी साजरा करण्यात आली. यावेळी जामा मस्जिद चौक येथून भव्य जुलूसला सुरुवात करण्यात आली. जुलूस मार्गांवर विविध ठिकाणी मिठाई, अलपोहार सोबत पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी यावेळी दरवर्षी प्रमाणे लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत समाजात एकता, सलोखा एकोपा जपत काँग्रेस कमिटीच्या वतीने धार चौकात मिठाई व थंडपेय वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोणार नगरीचे मा.नगराध्यक्ष भूषण मापारी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल गुगलीया,ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे,तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके,उपाध्यक्ष न.प.आबेद खान, गटनेते नितीन शिंदे,आरोग्य सभापती अब्दुल उबेद, नगरसेवक संतोष मापारी, साहेबराव पवार,गुलाब सरदार,जमील कुरेशी,रमजान परसुवाले,शाम राऊत, माजी नगरसेवक अंबादास इंगळे,एजाज खान,शेख रउप शेख मेहबूब, विकास मोरे, शंकर हेंद्रे, शेख अफसर शेख तुराब, शेख अजमत शेख अनामत, हुसेन कुरेशी,इम्रान खान,मोशीन शहा, सय्यद तैजीब,जब्बार कुरेशी, शेख मुख्तार शेख अहमद, शेख अब्दुल शेख इब्राहिम, शेख दादा मिया शेख युसुफ, शेख यासीन शेख मुनाफ, सय्यद मेहबूब, तोफिक शेख, अनामा शेख, सादिक शेख, रहमत शेख, इजहार शेख, शेख अजमत, सय्यद तोफिक , शेख मझहर, उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिद चौकातून ईद-ए-मिलादुन्न नबी ची मिरवणूक शांततेने जामा मस्जिद चौक,पोलीस स्टेशन,साबणपुरा,धार चौक, ते कब्रस्तान येथे मिरवणूकचा समारोप जामा मस्जिद चे इमाम ईदगाह येते हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम यांच्या जीवनावर प्रवचन करून (फात्या खानी) करून (तबारक) प्रसाद वाटून सांगता करण्यात आली.



