आ. गायकवाड यांच्यावर कांग्रेस प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
म्हणाले, ते केवळ जावाई व नातेवाईकांनाच ठेके देतात

प्रतिनिधी | बुलडाणा
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण कार्यकर्त्यांना ३५ कोटीची कामे दिली आहे, जेणे करुन त्यांना रोजगार मिळाला असल्याचा दावा पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान केला होता. यावर कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आ. गायकवाड यांच्यावर बोचरी टीका करतांना आरोप केला आहे की, त्यांनी केवळ आपल्या जावाई व नातेवाईकांनाच ठेके दिले आहे, सर्व सामान्य कार्यकर्त्यांला ते ठेका देत नाही. त्यांनी खरेच सर्व सामान्य कार्यकर्त्याला ठेका दिला असेल तर त्यांनी मतदार संघातील कामाची श्वेत पत्रिका जाहिर करावी असे आवाहन ही केले.
दोन दिवसापूर्वी बुलडाण्यात पक्षप्रवेश प्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत आ. संजय गायकवाड यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला. या प्रसंगी आ. गायकवाड यांनी कार्यकर्ता मजबूत असेल तर नेता मजबूत राहतो असे म्हणत आपल्या मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा म्हणून आपण कोटयावधीची कामे दिल्याचा दावा केला होता. यावर कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कटू शब्दात टीका करत म्हणाले की, आ. गायकवाड यांची बोबडीच वळली. बोलतांना बोलून गेले व नंतर म्हणतात की माझा बोलण्याचा विपर्यास्त करण्यात आला आहे. त्यांची यांची तब्येत लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली.



