अखंड भारताचे निर्माते सम्राट अशोक – सत्यपाल महाराज

बुलडाणेकरांनी प्रबोधनकार म्हणून केला जाहीर सन्मान

प्रतिनिधी | बुलडाणा
प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी उभे केलेले विशाल साम्राज्य हे कष्टकरी बहुजन समाजाच्या हिताचे व सुखाचे होते. भारतात सर्वप्रथम पशुंसाठी दवाखाने गोशाळा उभे करणारे सम्राट, दळणवळणासाठी जगातील सर्वात लांब रस्ता व हायवे बनवणारे पहिले सम्राट. माझी प्रजा ही माझे पुत्र आहे असे म्हणून विशाल साम्राज्याचा कारभार सांभाळणारे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जम्मू-दीपाची निर्मिती केली व अखंड भारत तयार केला असे प्रतिपादन सप्त खंजिरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी बुलडाणा येथे केले.
ते, बुलडाणा येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम मंगळवार २४ मार्च रोजी रात्री शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शी सम्राट अशोक जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून दादासाहेब काटकर, गजानन गिरके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत शाहीर डी.आर. इंगळे, शिवसेना नेते गणेशसिंग राजपूत, इंजि. विजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ आराख, दामोदर बिडवे, प्रा. डी.आर. माळी, अशोक दाभाडे, आशिष खरात उपस्थिती होते. गेल्या सहा वर्षापासून बुलढाणा शहरात सार्वजनिक स्वरूपात महाराष्ट्रातील पहिली सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महूचे अध्यक्ष भंते डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी केले. सत्यपाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा रूढीसपरंपरा व समतेचे विचार संपूर्ण हयात भर आपल्या कीर्तनातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले, तुकारामांपासून गाडगेबाबा पर्यंतचे विचार हे सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या वाणीने जनसामान्यात पोहोचविल्यामुळे बुलढाणा शहरातील समस्त बुलढाणा करांच्या वतीने प्रबोधनकार ही उपाधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष कुणाल पैठणकर यांनी केले तर संचालन प्रा. राजेश खंडेराव तर आभार प्रा. प्रदीप जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास करीता अध्यक्ष कुणाल पैठणकर कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप जाधव सचिव प्रा. राजेश खंडेराव, कोषाध्यक्ष आत्माराम चौतामोल, के. डब्ल्यू.प्रधान एड.राहुल दाभाडे, संजय खांडवे, संजय इंगळे, रितेश खिल्लारे,शशिकांत इंगळे, पद्माकर डोंगरे, राज खिल्लारे, सुरेश सरकाटे, गणेश झोटे, पंजाबराव निकाळजे, रामदास दाभाडे,अजय जाधव व सर्व समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!