लोणारात अहिंसेचा संदेश अन् भक्तीचा गजर

बुधवारपासून जैन साध्वीजींचे 'आत्मोत्सव चातुर्मास' पर्व!

लोणार

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या लोणार नगरीत जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास (वर्षायोग) पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात भक्तीचा अभूतपूर्व संगम बघावयास मिळणार आहे. सदर पर्व बुधवारपासून प्रारंभ केले जाणार आहे.

या अलौकिक आध्यात्मिक महोत्सवासाठी परम पूज्य महाराष्ट्र प्रवर्तनी प.पू. प्रभाकवरजी म.सा. यांची सुशिष्या करुणामुर्ती पैसठीया जाप आराधिका प.पू.किरणसुधाजी महाराज साहेब, तेला तप आराधिका विशालप्रभाजी महाराज साहेब आदी ठाणा ५ (पाच साध्वीजी) यांचा  ऐतिहासिक ‘चातुर्मास मंगल प्रवेश’ सोहळा येत्या बुधवारी (22 जुलै) मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. शहरातील शिवाजी कॉलनी येथून या मंगलमय पर्वाची दिमाखदार सुरुवात होणार असून, या उत्सवासाठी शहरातील संपूर्ण जैन समाजात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जैन परंपरेनुसार, पावसाळ्याच्या चार महिन्यांत निसर्गातील सूक्ष्म जीवांच्या रक्षणासाठी आणि ‘अहिंसे’चा संदेश देण्यासाठी जैन संत आपला पायी प्रवास (विहार) थांबवून एकाच ठिकाणी स्थिर राहतात. यंदा लोणार नगरीचे भाग्य उजळले असून, लोणार शहराची आण बान शान स्वर्गीय प.पू. प्रभाकवरजी म.सा. यांची जन्मुभूमी असलेल्या लोणार शहरात यावर्षी चातुर्माससाठी प. पू. किरणसुधाजी म.सा. यांच्यासह पाच साध्वीजींच्या प्रदीर्घ तप-साधनेचा आणि अमृतवाणीचा लाभ लोणारकरांना पुढील चार महिने मिळणार आहे.

जयघोष चा गजर अन् मंगल कलश यात्रा!

बुधवार ला सुवर्णक्षणी सकाळी शिवाजी कॉलनी येथून साध्वीजींचे शहरात अभूतपूर्व स्वागत केले जाईल. येथून निघणाऱ्या भव्य मंगल प्रवेश मिरवणुकीत (वरघोडा) पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या शेकडो महिला आणि जयघोष करणारे श्रावक सहभागी होणार आहेत. ‘गुरुदेव की जय’ अशा गगनभेदी जयघोषाने संपूर्ण लोणार नगरी दुमदुमून निघणार आहे.

चार महिने होणार आध्यात्मिक अनुष्ठान

यावेळी पहिल्यादाच गौतम लब्धी जाप अनुष्ठान सुरू होत आहे तसेच पैसठीय छंद जप चे आयोजन करण्यात आले आहे.तसेच
या चातुर्मास काळात दररोज सकाळी साध्वीजींची विशेष अमृतमयी प्रवचने, सामूहिक नवकार जप, उग्र तप-साधना, स्वाध्याय, प्रतिक्रमण आणि युवा व बालकांसाठी विशेष संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने लोणार शहराला जणू एका मोठ्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.या ऐतिहासिक चातुर्मास प्रवेश सोहळ्यासाठी वर्धमान जैन स्थानकवाशी श्रावक संघ, प्रभा बहू मंडळ, जिनेश्वर युवा ग्रुप, चैतन्य भक्ती मंडळ, गुरु गणेश मिश्री वर्ल्ड ग्रुप आणि विविध मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. लोणारसह संपूर्ण विदर्भातील भाविकांनी या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे भावपूर्ण आवाहन वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ज्ञान, वैराग्य, तप आणि साधनेचा लोणार नगरीत त्रिवेणी संगम

प. पू.किरणसुधाजी, विशालप्रभाजी, प्राप्तीश्रीजी, संस्कृतिप्रभाजी, स्वीकृतीप्रभाजींच्या आगमनाने भक्तीचा सण आला. चातुर्मासाच्या मंगल पर्वाची शिवाजी कॉलनीतून होईल भव्य सुरुवात, गुरुमाऊलींच्या चरणी सकल जैन श्रीसंघाचे कोटी कोटी प्रणिपात!”

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!