शेकडो शेतकऱ्यांचे भवितव्य जिल्हा ग्राहक मंच्याच्या दावनिला; कृषी विभागाचे हात वर

 

बुलडाणा

जिल्ह्यात यंदा निकृष्ट किंवा न उगवलेल्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी कृषी विभागात आता पर्यत तब्बल ९९१ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी सुमारे ५० टक्के तक्रारी एकट्या खामगाव तालुक्यातील आहेत. शेती, बीयाणे, परवानगी, पेरणी, शेतकरी हे सर्व विषय कृषी विभागाशी निगडीत असले तरीही या संदर्भात कृषी विभागाने हात वर केलेले असून या संदर्भात आता जिल्हा ग्राहक मंच निर्णय घेणार असल्याने शेतकऱ्याचे भवितव्य अंधारात दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्हयात यंदा सुमारे सव्वा सात लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. १० जुलै पर्यत जिल्हयात ५ लाख ६५ हजार ४४७ हेक्टरवर पेरणी करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. यात ३ लाख ४३ हजार ४७१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे तर १ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. यंदा सर्वत्र अलनिनोचा प्रभाव असल्याने पावासाचे प्रमाण कमी सांगण्यात आले होते, त्या नुसार मान्सूनचे आगमन उशिरा झाले. १४ जुलै पर्यत जिल्हयात एकूण ७७.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वसाधारण पर्यन्यमानाशी तुलनात्मक टक्केवारी नुसार सर्वात अधिक पावसाची नोंद जिल्हयात जळगाव जिल्हयात २.८० टक्के नोंदवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ संग्रामपूर तालुक्यात १.७२ टक्के, सिंदखेडराजा १.५२ टक्के, दे.राजा १.१४ टक्के, खामगाव ०.०१ टक्के, शेगावात १.१६ टक्के, चिखली ०.७५ टक्के,नांदुरा ०.०५ टक्के,लाेणार ३.६ टक्के, मेहकर १.९ टक्के, मलकापूर २.७ टक्के मोताळा १.५ टक्के, नांदुरा, ०.४ टक्के नोंदवण्यात आला आहे. या पावसाच्या भरावश्यावर शेकडो शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे.

दुसरीकडे जिल्हयातील अनेक तालुक्यात सोयाबीन बीयाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आता झपाटयाने नोंदवलया जात आहे. १४ जुलै पर्यत जिल्हयात सुमारे ९९१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. यात सर्वात अधिक तक्रारी खामगाव तालुक्यातून ५५० तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. त्या पाठाेपाठ शेगावातून २०० तक्रारी, संग्रामपूर ४६, नांदुरा ४६, चिखली ४१ तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत, तर उर्वरित तक्रारी इतर तालुक्यातून दाखल झाल्या आहे. या तक्रारी पश्चात कृषी विभागाच्यावतीने तालुकास्तरवर असलेल्या तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे. सदर पडताळणीसाठी ७ ते १५ दिवसाचा कालावधी लागतो. या पडताळणी मध्ये बीयाण्याची गुणवत्ता खराब असल्यास शेतकऱ्यांना जिल्हा ग्राहक मंचकडे तक्रार दाखल करावी लागते, त्यावर जिल्हा ग्राहक मंच्यावतीने सदर कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देतो, त्यानंतर सदर कंपनी पुढील कार्यवाही करते. थोडक्यात जिल्हयातील शेकडो शेतकऱ्यांचा विषय हा कृषी विभागाशी संबंधित जरी असला तरी ही या प्रक्रियेत कृषी विभागाचे हात वर असल्याचे चित्र आहे, अनं शेतकऱ्यांचे भवितव्य जिल्हा ग्राहक मंच ठरवणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

खामगाव आघाडीवर; निम्म्याहून अधिक तक्रारी एकट्या तालुक्यातून

सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी कृषी विभागाकडे दाखल झालेल्या ९९१ तक्रारींपैकी तब्बल ५५० तक्रारी खामगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक फटका खामगावमधील शेतकऱ्यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेगाव तालुक्यातून २००, तर संग्रामपूर आणि नांदुरा येथून प्रत्येकी ४६, तसेच चिखली तालुक्यातून ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. उर्वरित १०८ तक्रारी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधून दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

 

रवी सिड‌सच्या सर्वात अधिक तक्रारी

जिल्हयात यंदा रवी सिडस या बीयाण्याने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले असल्यचे चित्र आहे. जिल्हयातील ९९१ तक्रारी पैकी एकटया रवी सिड‌स च्या विरोधात ५७५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ ६८ तक्रारी या बुस्टर सीड‌सच्या आहेत. बाकी तक्रारी विविध कंपन्याशी संबंधित आहे.

 

बीयाणे न उगवण्याची अनेक कारणे

जिल्हयात शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जमिनीत जास्त ओल नसेल तर बीयाणे उगवत नाही. तसे बीयाणे न उगवण्याचे अनेक कारणे आहेत. दरम्यान या तक्रारीची समितीने दखल घेतली आहे, लवकरच अहवाल मिळणार आहे. अहवाल आल्यावर उगवण न झाल्याचे कारण समोर येईल.

गणेश सावंत, गुण नियंत्रण अधिकारी, बुलडाणा

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!