स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संगीत परीक्षेत सुयश

बुलढाणा :
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत शास्त्रीय गायन,वादन व कथ्थक विषयाचा एप्रिल-मे 2026 या सत्राचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन,हार्मोनियम व तबला या विषयांमध्ये घवघवीत यश संपादन केले असून गुणवंत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रारंभिक परीक्षेत हार्मोनियम विषयामध्ये वैशाली मोरे तर शास्त्रीय गायन विषयांमध्ये प्रा.रत्नमाला कस्तुरे, प्रतिमा कस्तुरे,प्रिया गोफने, कु.माहिरा शेख हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर मंजुषा जाधव द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत तर प्रवेशिका प्रथम परीक्षेत गायन विषयांमध्ये डॉ.विवेक इंगळे, आरोग्य विस्तार अधिकारी शरदकुमार ठाकूर,कु.शौर्या चंदन हे विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले असून शीला नाफडे ह्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.व मध्यमा प्रथम परीक्षेत शास्त्रीय गायन विषयात इंजिनियर ज्योती खरे या द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून मध्यमा पूर्ण परीक्षेत गायन विषयांमध्ये डॉ.मिलिंद जाधव व डॉ.रविंद्र गोफने हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.तबला विषयांमध्ये प्रारंभिक परीक्षेत शार्यन चोपडे,प्रज्वल पवार, स्वराज गावंडे हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून तेजस्वी वाघ,अत्रेय पाटील,देवांश गावंडे,सुहास पडघान हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर प्रवेशिका पूर्ण परीक्षेत तबला विषयात सोहम नागरे हा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे,प्रा.अमोल दिशागज यांनी मार्गदर्शन केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ संगीतज्ञ अरविंद टाकळकर गुरुजी यांच्यासह संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.



