दारूच्या पैशावरून वाद; शेगावात तरुणाचा खून

दारुच्या पैशावरुन झाला होता वाद

शेगाव,

दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित घटनेत झाल्याने शेगाव शहर हादरले आहे. आठवडी बाजार परिसरात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, शाहरुख हारून पटेल (वय ३१, रा. शेगाव) व शेख जावेद करीम (वय ३०, रा. काँग्रेस नगर, शेगाव) यांच्यात मंगळवारी, १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजार परिसरातील हनुमान मंदिराजवळ वाद झाला. दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच उग्र झाला.

वादाच्या भरात आरोपी शेख जावेद करीम याने शाहरुख पटेल यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरदार मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात शाहरुख गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निमिष मेहत्रे हे पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संतप्त नागरिकांना शांत केले.

जखमी शाहरुख पटेल यांना पोलिसांनी तातडीने शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी गजानन राजू तायडे (वय ४०, रा. धनगर नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी शेख जावेद करीम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार निमिष मेहत्रे हे करीत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीदेखील आठवडी बाजार परिसरात अशाच प्रकारची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे या परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!