गोरसेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सोनू चव्हाण यांची निवड

कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्राची संयुक्त बैठकीत निर्णय

प्रतिनिधी | बुलडाणा
येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू चव्हाण यांची गोरसिकवाडी – गोरसेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक २४ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील धाराशिव येथे पार पडली. या बैठकीत संघटनेच्या विस्तार व पुढील कार्यदिशेबाबत सविस्तर चर्चा करून एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
सोनू चव्हाण सारख्या सक्षम नेतृत्वाची संघटनेला गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यांचा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या बददल असलेला विश्वास लक्षात घेता सोनू चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोरसिकवाडी चळवळ व गोरसेनेला अधिकचे बळ देण्यासाठी सदर निवड करण्यात आली. यात संघटनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करणे, विविध राज्यांतील समन्वय वाढवणे तसेच समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची जवाबदारी चव्हाण यांच्यावर टाकण्यात आली.
सोनू चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व युवक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून, गोरसेना संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना संघटनेचा विस्तार करणे, राज्यांतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल गोरसेना संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून, या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!