शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने रवींद्र जोशी सन्मानित

लोणार 

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, पिंपळनेर (ता. लोणार) येथील समाजशास्त्र विषय शिक्षक रवींद्र उद्धवराव जोशी यांना ‘शिक्षण संजीवनी’ मासिकाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे येथे ९ सप्टेंबर रोजी ‘संजीवन विचारांची पेरणी’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय मासिक ‘शिक्षण संजीवनी’च्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातील योगदानाची दखल घेत रवींद्र जोशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशक व लेखिका माधुरी गोखले तसेच एकविरा मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे ज्येष्ठ भालचंद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक एकनाथ आव्हाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. ‘शिक्षण संजीवनी’ मासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप हे निमंत्रक होते, तर संपादक देविदास हे संयोजक म्हणून उपस्थित होते.  या वेळी मान्यवरांच्या हस्ते रवींद्र जोशी यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच सामाजिक जाणीव, मूल्ये आणि सर्जनशीलतेची रुजवण करण्यासाठी जोशी यांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

रवींद्र जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंपळनेर परिसरातील नागरिक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

 

शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल

पिंपळनेर येथील जिल्हा परिषद शाळेत समाजशास्त्र विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र जोशी यांच्या शैक्षणिक कार्याची ‘शिक्षण संजीवनी’ने राज्यस्तरावर दखल घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत त्यांच्या सामाजिक जाणीवा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!