एसटीच्या उत्पन्नवाढीत बुलढाणा विभागाची राज्यात अव्वल

विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांचा जयश्री शेळके यांच्याकडून गौरव

 

बुलडाणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बुलडाणा विभागाने उत्पन्नवाढीच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भेटीदरम्यान जयश्री शेळके यांनी बुलडाणा शहरातील रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचाही विषय उपस्थित केला. रिक्षाचालकांच्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील काही अडथळे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची गरज याबाबत त्यांनी विभाग नियंत्रकांशी चर्चा केली. यावेळी विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांनी संबंधित विषयांचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, तसेच शक्य तेथे योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शुभांगी सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा विभागाने नियोजनबद्ध कामकाज, प्रवासी सेवेला दिलेले प्राधान्य आणि उत्पन्नवाढीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे विभागाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

दरम्यान, बुलढाणा विभागाच्या या यशाबद्दल परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक व राजकीय स्तरातून शुभांगी सिरसाट यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!