बुलढाण्यात रंगणार गझल आणि भीमगीतांचा सांस्कृतिक सोहळा

स्मृतीशेष रमेश सरकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन

बुलडाणा,

आंबेडकरी साहित्य अकादमी, बुलडाणा यांच्या वतीने ज्येष्ठ गझलकार स्व. रमेश सरकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय गझल स्पर्धा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीत स्पर्धा घेण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव सोहळा १ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बहारदार गझलसंध्या देखील होणार आहे. हा कार्यक्रम शहरातील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी हॉल येथे सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पार पडणार आहे.
दरम्यान बुलडाण्यात आयोजित स्पर्धांमध्ये राज्यभरातील साहित्यप्रेमी आणि गायकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. गझल स्पर्धेत प्रथमेश गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून अमेय तांदूळजे यांनी द्वितीय, तर गिरीश खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी भाग्यश्री क्षीरसागर आणि शिवशंकर दौंड यांची निवड करण्यात आली आहे.
भीमगीत स्पर्धेत रमा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवत आपला ठसा उमटविला. संतोषी झाल्टे यांनी द्वितीय, तर शैला हिवाळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. सुजाता लहाने आणि सुनिता अवसरमोल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ‘बारोमासकार’ डॉ. सदानंद देशमुख राहणार असून, प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी लक्ष्मणराव घुमरे, प्रा. डॉ. संतोष आंबेकर, करुणा सरकाटे आणि अनिरुद्ध सरकाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समारंभानंतर सुभाष मगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष गझलसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिवाजी जवरे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, वंदना वैराळकर, लक्ष्मण उगले, अमोल शिरसाठ, शिलवंत सिरसाठ, रमेश आराख आणि विशाल मोहिते हे गझलकार आपल्या सादरीकरण करणार आहे.
या सांस्कृतिक पर्वाचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आंबेडकरी साहित्य अकादमीच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे आणि सदस्यांनी केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!