आता घरपोच पाईपलाईन ने मिळणार गॅस सुविधा, आ. संजय गायकवाड यांचा यशस्वी पाठपुरावा

बुलडाणा
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव व प्रयत्नाला शासन दरबारी यश मिळाले आहे. बुलडाणा शहराच्या विकासाला गती देणाऱ्या आणि शहराचा दर्जा उंचावणाऱ्या महत्त्वाकांक्षी पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) योजनेचा मार्ग आता मोकळा झाला असून, लवकरच ही योजना बुलडाण्यात राबवली जाणार आहे. या योजनेमुळे शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक गॅस पुरवठा पाईपलाईन द्वारे घरपोच उपलब्ध होणार आहे.
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा शहराचा चेहरा मोहरा पालटला अाहे. आत दुसऱ्या टप्यात आ. गायकवाड यांच्या माध्यमातून बुलडाणा शहराला मेट्रोसिटीच्या धर्तीवर सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, पीएनजी प्रकल्पास तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत घरगुती गॅस पाइपलाइनद्वारे थेट घरी पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे सिलेंडरची गरज कमी होणार असून, गॅस गळतीचा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच व्यावसायिक आस्थापनांनाही या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. पीएनजी योजनेमुळे शहरातील प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढल्यामुळे बुलडाणा शहर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित बनण्यास हातभार लागेल. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण आणि नियोजनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, पीएनजीसारख्या अत्याधुनिक सुविधेमुळे बुलडाणा शहराच्या विकासात नवा टप्पा गाठला जाणार असून, शहर मेट्रोसिटीच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पहिल्या टप्यात ९ कि.मी. चे काम होणार
पहिल्या टप्प्यामध्ये शहरामध्ये साडे नऊ किलोमीटरचे सीजीडी म्हणजे सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क जलद वेगवान विस्तार होणार आहे. नंतर हे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भागात याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार संजय गायकवाड हे सातत्याने शासनान दरबारी प्रयत्नशील आहे.

आ. गायकवाड यांनी व्यक्त केली खंत
या पथदर्शी व मेट्रोसिटीचा दर्जा वाढवणाऱ्या योजना राबवताना शहरातील रस्त्यांना काही प्रमाणात फटका बसणार आहे. पीएनजीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी भूमिगत पाइपलाइन टाकताना अनेक ठिकाणी रस्ते खोदावे लागतील, त्यामुळे काही काळ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, नागरिकांनी याबाबत चिंता करू नये, जे रस्ते खोदले जातील किंवा नादुरुस्त होतील, ते तातडीने दुरुस्त करून नव्याने मजबूत करण्यात येतील. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची गुणवत्ता अधिक चांगली राहील याची काळजी घेतली जाईलशहराच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि आधुनिक सुविधांसाठी काही तात्पुरत्या अडचणी सहन कराव्या लागतील, मात्र त्यातून बुलडाण्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!