आदर्श कॉलेजमध्ये उत्साहात वृक्षारोपण संपन्न

धामणगाव बढे
स्थानिक धा.बढे येथील आदर्श कॉलेजमध्ये दि. ३ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बुलढाणा येथील आयटीआय कॉलेजचे अधिकारी कांडेलकर सर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते कॉलेज परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते शेख साबीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श कॉलेजच्या प्राचार्य वाघ मॅडम,प्रा. गणेश हुडेकर सर,अनिल क्षीरसागर सर,राठोड सर, खडके मॅडम,धीरज पाटील सर,आकाश निमसे सर आणि सुनील गवई यांनी विशेष परिश्रम घेतले.
या वृक्षारोपण मोहिमेत कॉलेजच्या शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. लावलेल्या वृक्षांचे केवळ रोपणच न करता त्यांचे योग्य संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही याप्रसंगी सर्वांनी केला.




