मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू

नागरिकांनी सहकार्य करावे- मुख्याधिकारी  बोबडे

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भ

लोणार,-

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री आशिष बोबडे यांनी केले आहे .

 

यावेळी क्षेत्रीय अधिकारी सतीश कापुरे, श्री आकाश चव्हाण; पर्यवेक्षक श्री एस.एन. एन्नेवार , संतोष जाधव ,जी.एम.शर्मा, पारस सुटे. आदी उपस्थित होते बोबडे म्हणाले की, २५ मेहकर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत लोणार तालुक्यातील शहरी भागात, एकूण १८९८१ मतदार असून त्यांचे mapping पूर्ण करण्यात आले आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी एकूण ..20.बीएलओ कार्यरत असून पर्यवेक्षक..4. नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी २ .क्षेत्रीय अधिकारी.. बीएलओंना मदतनिस म्हणून अंगणवाडी सेविकांचीही नियुक्ती करण्यात आली असून सर्व बीएलओंना ..२३ ..जून रोजी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी बीएलओ घरी भेट देण्यासाठी आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे. २० ते २९ जून या कालावधीत आवश्यक साहित्याची तयारी, प्रशिक्षण व मुद्रण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ३०जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घराघरांत जाऊन गणना प्रपत्राद्वारे माहिती संकलित करणार आहेत.

५ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार यादीचा प्रारूप (मसुदा) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींची छाननी व निकाली काढण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.बोबडे यांनी यावेळी दिली. तसेच SIR चे काम सुरू झालेले असल्याने लोणार शहरातील प्रथम नागरिक सौ मीराताई भूषण मापारी उपाध्यक्ष आबेद खान यांच्या घरी जाऊन AERO, Supervisor BLO ह्यांनी त्यांना form वितरीत केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!