लोणारात शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

केवळ ७३ शाळांमध्येच कॅमेरे

 

लोणार

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले होते. मात्र, लोणार शहर व तालुक्यात या कडक आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. तालुक्यात शासकीय व निमशासकीय मिळून एकूण १५८ शाळा आहेत. यांपैकी केवळ ७३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, तब्बल ८५ शाळा अजूनही ‘तिसऱ्या डोळ्या’च्या नजरेविना सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.या धक्कादायक वास्तवामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहेत:

 

शासनाचा ‘जीआर’ केवळ कागदावर

तालुक्यातील अवघ्या ७३ शाळांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे

प्रशासनाचे दुर्लक्ष:

शासन निर्णय (GR) येऊन मोठा कालावधी उलटल्यानंतरही स्थानिक शाळा प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

 

विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात

वर्गात, प्रवेशद्वारावर आणि शालेय आवारात कॅमेरे नसल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना, विशेषतः मुलींना शाळेत पाठवताना कमालीच्या भीतीखाली आहेत.

 

समित्या फक्त नावापुरत्या:

शाळांमधील ‘सखी सावित्री समित्या’ आणि तक्रार निवारण समित्या केवळ कागदावरच सक्रिय असल्याचे चित्र आहे सीसीटीव्हीची देखरेख नसल्यामुळे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी बाहेरील टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळा निधीचे कारण पुढे करून कॅमेरे बसवण्यास टाळाटाळ करत आहनियम डावलणाऱ्या या ८५ शाळांवर शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचे धाडस अधिकच वाढले आहे. लोणार तालुक्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे सोडणाऱ्या या ८५ शाळांवर शिक्षण विभाग आणि गटशिक्षणाधिकारी कधी कारवाई करणार? आणि या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवले जाणार? असा संतप्त सवाल आता तालुक्यातील पालक आणि सजग नागरिकांमधून विचारला जात आहे.

 

 

लोणार शहरासह तालुक्यातील एकूण कॅमेरे व शाळा उपलब्ध

जि. प. शाळा 87 13

न. पा.शाळा. 06 02

खाजगी अनुदानित 42 38

स्वयं अर्थसहाय्य 23 20

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!