वीज समस्यांविरोधात   पृथ्वीराज गायकवाड यांचे उपोषण

 

धामणगाव बढे! एस. बि शेख

मोताळा येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयासमोर धर्मवीर फौंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांनी वीज समस्यांच्या विविध मागण्यांसाठी आज उपोषण सुरू केले. या आंदोलनाला मोताळा तालुक्यातील व धामणगाव बढे परिसरातील शिवसैनिक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. सदर आंदोलन 3सप्टेंबर रोजी par

यावेळी धामणगाव बढेचे प्रथम नागरिक सरपंच पती मोहन सपकाळ यांनी धामणगाव बढे परिसरातील वीज समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गावात वारंवार वीज ये-जा होत असल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार फ्यूज उडणे, कमी व्होल्टेजचा वीजपुरवठा होणे तसेच अनियमित वीजपुरवठ्यामुळे घरगुती व शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

धामणगाव बढे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करून वारंवार होणारे वीजखंडित होणे, कमी व्होल्टेज आणि फ्यूज उडण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनावेळी तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, भागवत दराखे, इसाक पटेल, अजिंक्य जाधव, शेख अश्फाक, दीपक भोरे, समाधान काळे, सचिन वाघ, शिवसेना उपशाखाप्रमुख राजेश जाधव यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीज समस्यांकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी उपस्थितांनी केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!