भैय्याचा, सोशल मीडिया वरुन विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा, उंची वाढवण्याचा दिला सल्ला

बुलडाणा,

बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड उपाख्य भैय्या, यांनी सोशल मीडियावर आज एक पोस्ट टाकली, या पोस्ट मध्ये त्यांनी विरोधकांना अापली उंची वाढवण्याचा सल्ला देत अप्रत्यक्ष आपली वाट न अडवण्याचा इशारा दिल्याने जिल्हयातील राजकिय घडामोडींना रंग आला आहे.
१ सप्टेबर रोजी चिखली विधानसभा मतदार संघाचे भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस बुलडाण्यात साजरा केला जातो आहे. त्या अनुशंगाने दुपार पासून बुलडाण्यातील कार्यकर्ते, समर्थक व पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. सदर वाढदिवसाची दोन दिवस आधीपासूनच चर्चा होत आहे. ही चर्चा बॅनर बाजी मुळे होत आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी महाले यांचा धाड नाका परिसरात सत्कार झाल्यावर संगम चौक व पुढे जयस्तंभ चौक परिसरात रॅली काढण्यात आली. यावेळी शहरात भाजप समर्थक व पदाधिकाऱ्यांत उत्साह दिसून आला.
दुसरीकडे मृत्युंजय गायकवाड यांच्या समर्थकाकडून सोशल मीडियावर युथ लीडर, मास लीडर, युथ पावर, पब्लिक सपोर्टर, युवा नेता आदी विविध विशेषण लावलेली एक पोस्ट व्हायरल केली. यात विरोधकांचे थेट नाव न घेता, काहीं राजकारणी अजूनही फक्त बोलण्यात अडकले आहे, तर भैय्यांचं राजकारण थेट जनतेच्या मनात पोहोचले असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर विरोधकांना उपरोधक सल्ला देत ज्यांना आमची उंची खटकते, त्यांनी आधी स्वतःची उंची वाढवावी, आम्ही कुणाच्या विरोधात नाही… पण ज्यांना आमची वाट अडवायची आहे, त्यांना काळच उत्तर देईल असा अप्रत्यक्ष इशारा देखील देण्यात आला आहे. यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा प्रचंड पाउस पडतो आहे. बुलडाणा व चिखलीत मागील काही काळापासून रंगत असलेले राजकारण व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष टोलेबाजी यामुळे राजकारणातले वातावरण चांगलेच तापत असल्याचे चित्र आहे.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!