कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाची भाजपाशी जवळीकता, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मान्य होईल का.?

जिल्हा बँक निवडणुकीतील प्रकार,

बुलढाणा

: जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणाच्या संचालक मंडळ निवड़णुकीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यातील सहकार क्षेत्राच राजकारण तापले आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपाची ‘मिलिभगत’ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२४ जुलै या अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जळगाव जामोद तालुका सोसायटी मतदारसंघातुन एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामधे सहकार नेते राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, भाजपाचे परीक्षित ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, ज्योती ढोकणे, जुबेर पटेल या तिघानी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस पक्षाचे ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व अन्य एका उमेदवाराच्या अर्जावर जळगाव तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा बँक प्रतिनिधीच्या अनुमोदक म्हणून सह्या आहे.

यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मध्ये कॉंग्रेस पक्षाने प्रसेनजीत पाटिल यांच्या विरोधात भाजपाला साथ देत निवडणुक लढ़विली होती. तेव्हा सर्वसामान्य कॉंग्रेसी विचारधारेच्या जनतेचा मोठा रोष पक्षावर आल्याचे दिसून आले होते. कॉंग्रेस, भाजपा कट्टर वैचारिक वाद असलेले पक्षातील नेते स्थानिक पातळीवर असे जुळवुन घेत असतील तर त्यावर राज्य पातळीवरील नेत्याची भूमिका काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपाच्या मदतीने निवडणुक रिंगनात उतरण्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा रंगू लागल्याने त्यावर जिल्हातीलच असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा कॉंग्रेस पक्षाचे अन्य नेते काय भूमिका घेतात याकड़े सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!