कै. कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
लोणार
कै. कु.दुर्गा क.बनमेरू विज्ञान व कै. कमलबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त २९ऑगस्ट २०२६ ला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू, अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क.बनमेरू हे उद्दघाटक म्हणून उपस्थीत होते. मंचावरील अतिथीच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.मंगेश ठोंबळ यांनी केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रकाश क.बनमेरू यांनी सांगितले की खेळ हा केवळ मनोरंजन नसून, तो जीवन जगण्याची कला आहे.शिस्त, परिश्रम, आणि संघभावना यांचा खरा धडा खेळ शिकवतो.जिंकणे-हारणे हे क्षणिक असते, पण खेळातून शिकलेली मूल्ये कायम राहतात.खेळ मनाला ताजेतवाने आणि शरीराला निरोगी ठेवतो.खेळाडूची खरी ओळख त्याच्या चिकाटीत आणि संघर्षात असते.खेळ हेच व्यक्तिमत्व घडवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे.युवकांनी जास्तीत जास्त खेळामध्ये सहभाग घेतला आणि वैयक्तिक खेळावर लक्ष केंद्रित करून सराव तर आपणही आपल्या देशाला मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे सुवर्णपदक मिळवून देऊ शकतो. तसेच आज स्पर्धेचे युग आहे आणि आपल्याला या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना क्रीडा क्षेत्रातील ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष क.बनमेरु यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जर खेळाडूंनी रोज खेळाचा सराव केला तर ते क्रीडा स्पर्धेत पदक मिळवू शकतात व त्यांना खेळाच्या माध्यमातून नोकरी सुद्धा मिळू शकते. त्यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थीनी साठी बुद्धिबळ व १०० मी धावणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याप्रसंगी महविद्यालयतील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सौरभ गायकवाड यांनी केले.




