स्वरविहार संगीत विद्यालयाच्यावतीने गजर विठ्ठल नामाचा भक्तीचा

 

बुलढाणा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वरविहार संगीत विद्यालयाच्या वतीने स्वरधारा गजर विठ्ठल नामाचा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 जुलै 2026 रोजी स्थानिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे सायंकाळी 6 वाजता करण्यात आलेले आहे.सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.तसेच ज्येष्ठ संगीत तज्ञ अरविंद टाकळकर गुरुजी,सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ.विवेक इंगळे,पुढारी न्युज वृत्तवाहिनी चे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखेडे, योगांजली महिला योग वर्गाच्या संचालिका अंजली परांजपे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सदर कार्यक्रमात स्वरविहार संगीत विद्यालयाचे विद्यार्थी भक्ती संगीताच्या माध्यमातून विठ्ठल नामाचा गजर करणार आहेत. सदर भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला तमाम संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे व प्रा.अमोल दिशागज यानी केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!