उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार, नागरिकांची सीईओ कडे तक्रार

प्रतिनिधी| बुलडाणा
मोताळा तालुक्यातील उबाळखेड येथील ग्रामपंचायती मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आला आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. हे निवेदन १ जानेवारी रोजी देण्यात आले.
या निवेदनात गावकऱ्यांनी आरोप केला आहे की, गावात मागील बऱ्याच कालावधीपासून ग्रामसभा तसेच महिला ग्रामसभा घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी या संदर्भात 20 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीला ग्रामसभा बोलावण्याच्या मागणीसाठी अर्ज दिला होता. त्या अनुशंगाने २० जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली परंतु या ग्रामसभेत कोणत्याही प्रकाराचा आर्थिक हिशेब देण्यात आला नाही. या संदर्भात गावकऱ्यांनी गावचे सरपंच यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आर्थिक हिशोब देण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येण्याबाबत सूचित केले असता या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची जि. प. स्तरावरून ग्रामपंचायची कार्यालयीन चौकशी करावी, चौकशी दरम्यान गुन्हा आढल्यास संबधिताकडून रक्कम व्याजासह वसूल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, कागपत्री आलेली सर्व कामे वास्तविक स्वरुपात आहेत का याची चौकशी करण्यात यावी, सर्व ग्रामस्य यांना विश्वासात घेऊन ग्रामस्यांसमोर सर्व बाबींचा उलगडा करण्यात यावा, ग्रामपंचायत शिपाई चांगदेव रदाळ यांनी शिपाई’ असताना लिपीक या पदाचा शिक्का बनवला असुन त्याचा गैरवापर तसेच दोन ते तीन पदाचा पगार कसा काय काढला जात आहे, याची चौकशी करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!