टोळक्याचा धाड पोलिस स्टेशनलाच घेराव, पोलिसांचा लाठी चार्ज

आरोपीला शिक्षा देण्यासाठी आक्रमक झाले होते टोटके

प्रतिनिधी | बुलडाणा
तालुक्यातील धाड येथे पोलिस ठाण्यात लपलेल्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी एका टोळक्याने चक्क पोलिस स्टेशनलाच घेराव केला. यावेळी परिस्थिती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ही घटना १० एप्रिल रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील मुख्य बाजार परिसरात जागेच्या वादावरुन दोन गट मागील काही दिवसापासून समोरासमोर येत होती. १० एप्रिल रोजी दुपारी २ ते २:३० च्या सुमारास ही धुसफूस उफाळून आली. दोन्ही बाजूचे तरुण आणि पुरुष रस्त्यावर उतरले. संताप इतका अनावर होता की, गटातील युवकांनी हातात येईल त्या वस्तूने एकमेकांवर वार करण्यास सुरुवात झाली. लोखंडी रॉड व टामीचा सर्रास वापर करण्यात आला. या हल्ल्यात दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले. हे पाहून सदर युवकांचे नातेवाईक अधिकच आक्रमक झाले. त्यांनी मुख्य आरोपीला आपले लक्ष केले. हे पाहून मुख्य आरोपीने आपला जीव वाचवण्यासाठी थेट पोलीस स्टेशनात जावून आश्रय घेतला. जखमींच्या समर्थकांना ही माहिती मिळताच शेकडोचा जमाव त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दिशेने धावला. पोलिस ठाण्याला घेराव करुन सदर आरोपीला ताब्यात देण्याची मागणी यावेळी जमावाने केली. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी प्रथम जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पवित्रा घेत लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे जमावाची पांगापांग झाली, मात्र परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!