अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करा

देऊळगाव राजा
तालुक्यातील मौजे डिग्रस बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात आली असून यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. दारूच्या व्यसनामुळे एका तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरीही संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायत डिग्रस बुद्रुक व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या वतीने अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना ३० जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात डिग्रस बुद्रुक गावातील मधुकर कुंडलिक हुसे, अंनता विठोबा मांटे, सै.मकसूद सै.अजगर, भाऊराव जयभाये हे खुलेआम अवैध देशी दारू विक्री करत असून, वारंवार समज देऊनही त्यांनी हा व्यवसाय बंद करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर व्यक्तींवर यापूर्वीही अंढेरा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांवर एमपीडीए कायदा किंवा तडीपारी अंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ता पाठविण्याची मागणी ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने केली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!