राष्ट्रवादीच्या नेत्यावर भर रस्त्यात सहा जणांचा कोयत्याने सपासप वार

प्रतिनिधी | बुलडाणा

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी  भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १९ एप्रिल रात्री घडली.

रविवारी रात्री शेतातील काम संपल्यावर रात्री ११ वाजेच्या सुमारास  संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा मार्गाने घरी जात होते.  ते गोवर्धन शिवारात आले असता, दबा धरून बसलेल्या ५ ते ६ अज्ञात इसमांनी त्यांना अचानक अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात संजय जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळले.

परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जाधव यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर असा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!