प्रशांत आंबी यांना पोलिसांनी केले स्थानबध्द ! बुलडाणा शहराला छावणीचे स्वरुप

बुलडाणा | प्रतिनिधी
कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी व त्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हयातून नुकतेच स्थानबध्द केले असल्याची माहिती समोर आली आहे.
28 एप्रिल रोजी प्रशांत आंबी व कार्यकर्ते या सोबतच इतर पुरोगामी संघटना आज दुपारी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थान समोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जाहिर वाचन करणार होते. या आंदोलनासाठी आंबी व सहकारी हे सकाळीच कोल्हापूर येथून बुलडाणाकडे निघाले होते. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा बुलडाणा शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांच्यावतीने आंबी यांना नोटीस देण्यात आली होती, त्यात त्यांना शहरातील शांतता भंग न करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे आ. गायकवाड यांनी घरसमोर आंदोलन केल्यास एकाएकाला बघुन घेण्याची भाषा आ. गायकवाड यांनी केली होती. यासाठी सकाळपासूनच आ. गायकवाड यांच्या कार्यालयाच्या बाहेर मंडप टाकून मोठया प्रमाणात शिवसैनिक जमा झाली होती. त्यामुळे बुलडाण्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या दोन्ही प्रतिनिधीत्वामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर वाद टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने आंबी व कार्यकर्त्यांना बुलडाणा जिल्हयात येताच त्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!