खळबळजनक! कोणताही साप चावला तरी एकच लस

जिल्ह्यात दोन वर्षांत तब्बल २ हजार ६७४ जणांना सर्पदंश; आरोग्य यंत्रणेपुढे गंभीर आव्हान

 

बुलडाणा
जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ हजार ६७४ नागरिकांना विविध प्रकारच्या सापांनी दंश केल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. विशेष म्हणजे, दंश करणारा साप हा विषारी असो वा बिनविषारी, सापाच्या दंशानंतर रुग्णांना एकाच प्रकारचे अँटी-स्नेक व्हेनम इंजेक्शन दिले जात असल्याची बाब चर्चेचा विषय ठरत आहे.
विदर्भाच्या पश्चिम टोकाला वसलेला बुलडाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ, जंगलयुक्त आणि शेतीप्रधान असा ओळखला जातो. सातपुडा पर्वतरांगांच्या प्रभावाखालील जिल्हयात तीन अभयारण्य असल्याने जिल्हयात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या सह इतर प्रमुख विषारी साप आढळतात. जिल्ह्यातील अनेक गावे, शेतजमिनी आणि ओढे-नाले यामुळे सापांचे वास्तव्य वाढले आहे. जिल्हयात दरवर्षी पावसाळयाच्या सुरुवाती पासून ते उन्हाळया पर्यत सर्पदंशाच्या घटना वाढत जातात. पावसाळ्यात पाण्याचा निचरा आणि बिळांमध्ये पाणी साचल्याने साप बाहेर पडतात, याच दरम्यान वखरणी, नांगरणी, पेरणी, खुरपणी आदींची असतात, अनेकवेळा रात्री बे रात्री शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी द्यावयासाठी जावे लागते मग अशावेळी सर्प व मानवात संघर्ष घडतो. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे बोलले जाते. जिल्हयात मागील दोन वर्षा सुमारे २ हजार ६७४ नागरिकांना सर्प दंश झाल्याच्या घटनेची नोंद आहे. यातील सर्वात अधिक ९३९ रुग्णावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ शेगाव येथील रुग्णालयात ५५४ रुग्णावर उपचार झाले. खामगाव येथे दोन वर्षात ४९२ रुग्णांना सर्पदंश झाला. लोणारात ११९, चिखली १०८, बीबी १०४, दे.राजा ८६, सि.राजा ७०, ज.जामोद ६७, वरवट बकाल ६०, धाड ३५, लाखनवाडा २८, तर सर्वात कमी रुग्ण दे.मही येथे १२ जणांवर उपचार करण्यात आले.

जिल्हयात साप अनेक मात्र औषध एकच
रुग्णाला ताप, सर्दी, टी.बी., काविळ असे वेगवेगळे आजार असले की त्या पध्दतीने वेगवेगळया स्वरुपाचे औषध दिले जाते. मात्र कोणत्याही प्रजातीच्या सापाने दंश केल्यावर त्यावर एकाच बहुउपयोगी पॉलीव्हॅलेंट या लसीचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मण्यार चावलेल्या रुग्णांला देखील हीच लस दिली जाते, मात्र भविष्यात त्या रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असल्याने त्यांना हदयविकाराचा धोका ही निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया व सिंगापूर या देशात सर्पदंश हा पॅन्डमीक ट्रीट म्हणून केला जातो, हा प्रकार आपल्याकडे नसल्याने अनेक सर्पदंश झालेल्या रुग्णांना अडचणीसा सामना करावा लागत आहे.

पॉलीव्हॅलेंट म्हणजे नेमके काय?
सर्पदंशाच्या उपचारात वापरली जाणारी पॉलीव्हॅलेंट अँटी-स्नेक व्हेनम लस आहे. सापांच्या विषावर ही लस तयार केली जाते. दंश केलेल्या सापाची अचूक ओळख पटली नाही तरीही डॉक्टर तातडीने या लसीच्या आधारे उपचार सुरू करू शकतात. सर्पदंशाच्या गंभीर रुग्णांसाठी ही लस जीवनरक्षक ठरते आणि वेळेत दिल्यास मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

चेन्नईच्या सापाचा डोस बुलडाण्यात
देशातील प्रत्येक राज्यात सापाच्या वेगवेगळया प्रजाती आहे. देशात सापावरील ॲन्टी डोस बनवण्याचे काम केवळ चेन्नई या ठिकाणी होते. लस बनवण्यासाठी हिमो टॉक्सिन, निरो टॉक्वसीन व हायपो टॉक्सीनचा वापर केला जातो. चेन्नई परिसरात पकडण्यात आलेल्या सापाच्या विषावर हिमो टॉक्सिनची प्रक्रिया करुन सदर डोस बनवले जात असल्याची माहिती आहे. चेन्नई येथून सदर डोस देशभरात उपलब्ध केले जातात. बुलडाण्यात साप चावल्यावर रुग्णास चेन्नई येथून आलेल्या डोसचा उपचार दिला जातो. हा भाग वेगळा आहे की तो साप कोणता होता ज्याच्या विषावर सदर डोस बनवण्यात आला आहे.

प्रत्येक आरोग्यकेंद्रात ही लस उपलब्ध
सर्पदंश झाल्यावर तो साप बिनविषारी असला तरीही अनेक रुग्ण गर्भगळीत होतात. सर्पदंशानंतर रुग्णांची तब्येत अत्याधिक गंभीर असेल अशा वेळी कोणत्या सापाने दंश केला हे तत्काळ कळत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पॉलीव्हॅलेंट अँटी-स्नेक व्हेनम या लसीचा उपयोग केला जातो. सध्या ही लस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बी.एस. बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!