समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:7 मजुरांचा जागीच मृत्यू

  नागपूर ते मुंबई या समृध्दी महामार्गावरील जालना, जिल्हयातील कवडची परिसरात  भरधाव वेगाने जाणाऱ्या  ट्रकने महिंद्रा पिकअपला  जोरदार धडक दिली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यु झाला, तर सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना 1 एप्रिल रोजी सायंकाळी घडली.

         मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून समृध्दी महामार्गावर वाढलेले गवत काढण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी  बदनापूर तालुक्यातील  केळीगव्हाण व याच भागातील खादगाव येथील काही कामगार महिलाची  निवड या कामासाठी करण्यात आली होती. काम संपल्यावर या महिला समृध्दी महामार्गाने पिकअप मध्ये बसून जात होत्या. समृध्दी महामार्गावरील जामवाडी परिसरात सदर व्हॅन थांबवली होती. यावेळी नागपूर कडून मुंबई कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रकाने या पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली.  ही धडक एवढी भिषण होती की सात महिलांचा जागीच मृत्यु झाला.

या  घटनेची माहिती मिळताच समृध्दी महामार्गावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून जखमीना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यता आले.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!