बदलीची कुणकुण लागताच तुकाराम मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय
अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत केली पाचपट वाढ

प्रतिनिधी |
प्रशासनातील कडक आणि निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांना बदली होण्याची कुणकुण लागताच त्यांनी तत्काळ मोठा निर्णय घेतला. अपंग (दिव्यांग) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल पाचपट वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
दिव्यांगासाठी मागील ३४ वर्ष जुन्या योजनेच्या आधारे लाभ दिला जातो आहे. यात कोणताही बदल करण्यात आला नाही. मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. याची खात्री व कुणकुण लागताच तुकाराम मुंडे यांनी हालचाल करत शिशुवर्ग ते वर्ग आठवी पर्यतच्या विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीत पाच पट वाढ करुन टाकली. आता दरमहा दिव्यांगाना सदर मदत उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा अधिक समावेश व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुकाराम मुंडे यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक पालक आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, बदलीच्या चर्चांदरम्यान घेतलेल्या या निर्णयामुळे मुंडे यांच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. प्रशासनातील संवेदनशीलता आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.




