अहमदाबादमधील आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी | अहमदाबाद

येथील आसाराम आश्रम पाडण्यात येवू नये ही आश्रमाची अपील  उच्च न्यायालयाच्या दुहेरी न्यायमूर्तींच्या खंडपीठाने  फेटाळले आहे. त्यामुळे आता सदर आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे आश्रम आता  कोणत्याही क्षणी  पाडला जाईल.

यापूर्वी अहमदाबादमधील मोटेरा येथील आसाराम आश्रमाची जमीन परत घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले होते की, आश्रमाने जमीन देताना सरकारने घातलेल्या अटींचा भंग केला आहे. त्यानंतर आश्रमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश योग्य ठरवला होता, त्यामुळे आश्रमाने एकल न्यायमूर्तींच्या आदेशाला दुहेरी न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या दुहेरी न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आश्रमाचे अपील फेटाळताना नमूद केले की, आश्रमाने वारंवार नियमांचा भंग केला आहे आणि नदीची जमीनही बळकावली आहे. नदीच्या जमिनीचे नियमितीकरण (रेग्युलरायझेशन) होऊ शकत नाही.  आश्रमाने स्थगिती (स्टे) मागताना सांगितले होते की, 45 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे. तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितले की, जमीन रिकामी करा तर आम्ही स्थगिती देऊ. आश्रमाने सांगितले की, हमी दिल्यास सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार अपील करता येणार नाही.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!