खळबळजनक ; आफ्रिकेत हाहाकार माजवणारा वायरस भारतात दाखल ; महिलेला रुग्णालयात केले भर्ती

अखेर कठोर तपासणीनंतर ही इबोलाचा भारतात प्रवेश

 

वृत्तसंस्था

आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि हाहाकार पसरवणाऱ्या इबोला विषाणूने कठोर तपासणी पश्चात ही भारतातही धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परदेशातून आलेल्या एका महिलेमध्ये इबोला संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कठोर वैद्यकीय तपासणीनंतर या संसर्गाची पुष्टी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला विषाणू ने हाहाकार उडवला आहे. अनेकांचा मृत्यु यात झाला आहे. काँगोमध्ये गेल्या २० दिवसांत २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इबोला विषाणूचा ‘बुंडीबुग्यो’ प्रकार वेगाने पसरत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. त्या पश्चात सर्वच देशातील विमानतळावर सावधगिरी बाळगत कठोर तपासण्या केल्या जात होत्या. त्यापश्चात ही युगांडाहून राजस्थानला फिरायला आलेल्या महिले मध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे आढळली आहेत. ही महिला जयपूरच्या राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (RUHS) मध्ये दाखल आहे. रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अहवाल येई पर्यंत सर्व खबरदारीचे उपाय सुरू राहतील.

तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवले
आरयूएचएस (RUHS) रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, सध्या महिलेमध्ये इबोला विषाणू संसर्गाची पुष्टी झालेली नाही. इबोला संसर्गाशी मिळतीजुळती लक्षणे आढळली आहेत. तपासणी अहवालानंतरच निष्कर्ष काढला जाईल. तथापि, विशेष प्रोटोकॉलनुसार महिलेवर उपचार आणि निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. महिलेचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!