लोणारात ‘क्लीन लोणार, ग्रीन लोणार’ मोहिम प्रारंभ 

जागतिक पर्यावरण दिन, 'मी लोणारकर टीम'चा वर्धापन दिन साजरा

लोणार

शहरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरात “क्लीन लोणार ग्रीन लोणार मोहिम प्रारंभ करण्यात आली आहे. या मोहिमेत एक घर एक झाड  ही संकल्पना राबवण्यात  येणार आहे.    या मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (मंठा नाका, लोणार) येथून करण्यात आला.

दरम्यान यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे  यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धारातीर्थ पर्यंतच्या संपूर्ण परिसरात  स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली.  आपल्या शहराला आपली गरज आहे  ही टॅगलाईन घेऊन यापुढेही शहरात नियमित स्वरूपात वृक्ष लागवड, संवर्धन आणि स्वच्छता राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.  यानंतर पर्यटक सुविधा केंद्र (जुनी तहसील इमारत) येथे सकाळी १०:०० वाजता या मोहिमेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मी लोणारकर टीम’चे संतोष जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन खरात यांनी केले. मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना ‘माझी वसुंधरा अभियाना’विषयी शपथ दिली, तसेच पंचमहाभूतांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.  जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने, संबोधनाने आणि सहभागाबद्दल प्रमाणपत्र वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.  या उपक्रमाचे आयोजन  मी लोणारकर टीम, शिवछत्र मित्र मंडळ, निसर्ग मल्टीपर्पज संस्था, लोणार पत्रकार संघ, विदर्भ अकॅडमी, सर्व शासकीय कार्यालये आणि समस्त लोणारकर नागरिक यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आले होते.
याप्रसंगी  प्रकाश मापारी, नंदू मापारी, बळी  मापारी, पांडूरंग  सरकटे,  यशवंत नागूलवार (विभागीय वनाधिकारी),  रविंद्र जोगी (उपविभागीय अधिकारी, मेहकर),  प्रशांत सानप (उपविभागीय अधिकारी, लोणार),  भूषण पाटील (तहसिलदार, लोणार),  विभा वराडे (मुख्याधिकारी, न. प. लोणार), रविराज सिदोरे (तालुका कृषी अधिकारी, लोणार) यांच्यासह पत्रकार व लोणारचे नागरिक उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!