सभापती प्रा. राम शिंदे यांची भाजप नेते गोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

बुलडाणा,

   महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी गुरुवार ४ जून रोजी बुलढाणा दौऱ्यादरम्यान भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक विषयांसह विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.

प्रा. राम शिंदे यांच्या आगमनावेळी भाजपचे नेते योगेद्र गोडे व परिवाराच्यावतीने सभापती शिंदे यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या वातावरणात संवाद साधला. विविध भागांतील समस्या, जनतेच्या अपेक्षा तसेच पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.  भेटी दरम्यान भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, सिद्धार्थ शर्मा, विजयाताई राठी, सुरेश सिनकर, गणेशसिंग जाधव, सोहम झाल्टे, नंदू लवंगे, आशिष व्यवहारे, आकाश दळवी, आसिफ भाई, सचिन टेंभीकर, तेजस भंडारी, उमेश दळवी, गोपाल काटे, दत्ता जेउघाले, संजय वाघ, गौरव राठोड, मोहित भंडारी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्या साठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!