धर्मवीर युथ फाऊंडेशनची खामगाव विधानसभा कार्यकारिणी जाहीर
हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित युवा शक्तीची नवी फळी सज्ज

खामगाव
खामगाव विधानसभा मतदारसंघात धर्मवीर युथ फाऊंडेशनची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा येथील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी काळात युवकांचे संघटन बळकट करण्यासोबतच हिंदुत्वाचे विचार, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार खामगाव विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सामाजिक कार्याच्या माध्यमातून संघटनेची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
नव्या कार्यकारिणीत ऋषिकेश सुधीर पऱ्हाड यांची जिल्हाप्रमुखपदी, हर्ष संतोष महातो यांची जिल्हा संघटकपदी, वैभव वानखेडे यांची उपजिल्हाप्रमुखपदी तर सुमित काटे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खामगाव तालुकाप्रमुख म्हणून राहुल प्रवीण झापर्डे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून विजय कैलास सारवान यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
शहर संघटना मजबूत करण्यासाठी रणवीर पोटे आणि करण सकळकळे यांची उपशहरप्रमुखपदी, राम अमर झुराव यांची शहर संघटकपदी, सोहम रहाटोळे यांची शहर सोशल मीडिया प्रमुखपदी, तर गौरव खुमकर यांची विद्यार्थी आघाडी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून युवकांना एकत्रित करून सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासोबतच विविध प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. नियुक्तीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांसह खामगाव विधानसभा मतदारसंघातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीमुळे आगामी काळात खामगाव विधानसभा मतदारसंघात फाऊंडेशनच्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




