पं. विष्णू नारायण भातखंडे जयंतीनिमित्त स्वरविहार संगीत विद्यालयात अभिवादन

बुलढाणा
शहरातील सुप्रसिद्ध स्वरविहार संगीत विद्यालयात आधुनिक भारतीय संगीतशास्त्राचे प्रणेते पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात भातखंडे यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले अभियंता तथा स्वरविहारचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप लोलुरे यांच्या हस्ते पं. भातखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांनी पं. भातखंडे यांच्या जीवनकार्याचा आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यमन, भूपाली आणि वृंदावनी सारंग या रागांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमात संगीतप्रेमी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी डॉ. मंजुश्री खोब्रागडे, ॲड. अमोल देशपांडे, दिनेश कापुरे, आदित्य गोफणे, प्रसेनजित मोरे, राजश्री उबाळे, वैशाली मोरे, अभियंता ज्योती खरे, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. निलेश जाधव, डॉ. विवेक इंगळे, डॉ. गजेंद्र निकम, शरदकुमार ठाकूर, लता गुर्जर, विमल काळवाघे, शिल्पा डाबेराव, मंदा मानसकर, शैला हिवाळे, मंजुषा जाधव, शीला नाफडे, नीलम श्रीवास्तव, लक्ष्मी सुरोशे, वैशाली मुंदे, संतोषी झाल्टे यांच्यासह अनेक विद्यार्थी व संगीतप्रेमी उपस्थित होते.




