हे तर अर्ध पाकिस्तानी भूत; विजयराजचा राग काढला सरोदेवर,

आ.संजय गायकवाड यांचा मोर्चा आता ॲड असीम सरोदे कडे;

बुलडाणा

कथित बदनामीकारक वक्तव्य प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराजे शिंदे यांनी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना वकील असीम सरोदे यांच्यामार्फत १०० कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. यावर, आता आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना सोडून आपला मोर्चा ॲड सरोदे कडे वळवल्याचे चित्र आहे. यावेळी आ. गायकवाड यांनी

ॲड सरोदेवर काढत आंबी प्रकरणापासून मला हे अर्ध पाकिस्तानी भूत बघावयास मिळयाल्याची टीका केली.
दरम्यान यावेळी विजयराज शिंदेंवर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी केला. ते म्हणाले, मी जे जे आरोप केले आहे, त्या प्रत्येकात तथ्थ आहे, कारण त्यावेळी मी त्याच्या सोबत होतो. मला ही अनेक विषय माहिती आहे, अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. त्यांनी कोर्टातून नोटीस पाठवली, आमची या बाबत तयारी आहे. आम्ही देखील त्यांना न्यायालयीन मार्गाने उत्तर देऊ, शिंदे यांच्या आश्रम शाळेचा उल्लेख करत आदिवासींच्या मुलांना उपाशी ठेवल्याने अनेक मोर्चे देखील निघाले होते, असेही त्यांनी सांगितले. ॲड सरोदे यांच्यावर खालच्या पातळीत टीका करतांना आ. गायकवाड म्हणाले की, सरोदे यांना आमच्याशी खेटायचे असेल तर आम्ही ही कोर्टातून त्याच्याशी सक्षमपणे खेटू.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!