सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आलेला नाही; येणारा काळ निष्ठावंतांचाच – जालिंदर बुधवतांचा घणाघात

बुलढाणा : प्रतिनिधी

 

“दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने लाठीहल्ला केला. मात्र, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले. जवळपास महिनाभर चाललेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावे लागले. रात्र झाली की दिवस उगवतोच. सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेला नाही. त्यामुळे निष्ठावंतांनी चिंता करण्याची गरज नाही. येणारा काळ हा निष्ठावंत शिवसैनिकांचाच असेल,” असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला.

 

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुलढाण्याचे ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी पातळ अर्पण करून महाआरती करण्यात आली.

 

यापूर्वी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले तसेच बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. २६ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन, बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 

मेळाव्यात बोलताना बुधवत म्हणाले, शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेतील पदांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेतृत्व असून गोरगरिबांच्या न्यायासाठी शिवसेना सातत्याने लढत आहे. सत्ता येत-जात असते, मात्र संघटना आणि निष्ठा कायम राहते. त्यामुळे आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे.

 

सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत प्रत्येक कार्यकर्त्याने आपला बूथ व गावाची जबाबदारी स्वीकारून मतदारांचे अर्ज बीएलओमार्फत भरून घ्यावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

कार्यक्रमाला पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक सुनील घाटे, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजय इंगळे, गजानन उबरहंडे, महिला आघाडीच्या प्रतीक्षा पिंपळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!